तेल्हारा(विशाल नांदोकार): तालुक्यातच नव्हे तर अकोला जिल्ह्यात पुन्हा उष्णतेची लाट आली आहे सूर्य आग ओकू लागला आहे. यापूर्वी 47.6 पर्यंत तापमानाची नोंद झाली होती, पुन्हा पारा खाली आला होता. आता पुन्हा उष्णतेची लाट आली पारा 46.6 च्या वर गेला आहे. यामुळे अंगाची काहिली होत आहे तर ग्रामीण भागात कामाच्या वेळा बदलले आहे. सकाळी 10 पासून रस्त्यावर शुकशुकाट असतो. पूर्वीच्या तापमानाचे आकडे ओलांडून पारदर्शी पुढे पुढे सरकताना दिसतो. घरांचे क्षेत्रफळ वाढण्याचा नादात तसेच देशाच्या विकासासाठी रुंद रस्ते आवश्यक आहेत, हे जरी खरे असले तरी यासाठी लाखो झाडांची कत्तल होत आहे, हेही तेवढेच खरे आहे .
वाढलेल्या लोकसंख्येमुळे गावातील घरे कमी पडत असल्याने गावाला लागून प्लॉट पडत आहे. तिथे घर होत आहे, पण त्यासाठी वृक्षतोड होत आहे. प्रत्येकाला वृक्षांचे महत्त्व कळते पण वळत नाही हे तेवढेच खरे आहे. तापमानातील वाढ रोखण्यासाठी सर्व स्तरातून श्रीगणेशा करून तो शेवटास नेणे गरजेचे आहे. अकोला जिल्ह्याची तापमान फार पातळ 45 अंशाच्या आत मध्ये फिरत होते, पण आता दिवसा गणित तापमानामध्ये वाढ होऊन 47.6 वर तापमान पोहोचले . तालुक्यातील प्रत्येक गावाचे क्षेत्रफळ वाढत गेले, वस्ती वाढत गेली, शेत जमिनीवर घरे बांधली जाऊ लागली, त्यासाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. तसेच तालुक्याच्या उत्तरेकडे असणारा सातपुडा वृक्षतोडीमुळे बोडखा झाला. परिणाम कधी नव्हे एवढे तालुक्याचे तापमान वाढत आहे.
सध्याच्या खडक उन्हामुळेअबाल वृद्धांची दमछाक होत आहे, सकाळचा काही वेळ व संध्याकाळी सात नंतर चा वेळ सोडला तर रस्ते सामसूम असतात दुकानदार देखील रिकामे बसून असतात. एप्रिलच्या शेवटी वणीच्या सुरुवातीला तापमानात खूपच वाढ झाली होती, मध्यंतरी फनी वादळामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता तापमानात घट झाली होती . आता फनी चा प्रभाव ओसरला पुण्यात तापमान आणि उचल खाल्ली आहे. तापमान 47 च्या वर गेले आहे, सध्या रस्त्यांची विकास कामे सुरू आहे, त्यासाठी वृक्षतोड झाली, परिणामी रस्त्यावरील सावल्या हरवल्या आहेत. त्यामुळे दुचाकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास कष्टप्रद होतो, उन्हापासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या कामाचे वेळापत्रक बदलले आहे. शेतात कामासाठी मजूर सकाळी सहा ते दहा या वेळेत जातात तर दुपारी घरातच आराम करतात शहरातील लोक बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी सकाळी दहा पूर्वी किंवा संध्याकाळी साडेसहा नंतर घराच्या बाहेर पडतात एकूणच वाढत्या तापमानाचा सामान्य व्यक्तींवर फारच परिणाम झालेला आहे.
“आम्हाला क्लासेस ११ वाजेच्या आतच आटोपावे लागतात ११ नंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने विद्यार्थी क्लासला येऊ शकत नाही म्हणून आम्ही सकाळी ११ वाजे पर्यंतच व् सांध्यकाली ५ नंतर क्लासेस घ्यावे लागतात. तसेच आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना उन्हापासून वाचण्याचा सल्ला सुद्धा देत आहोत.”
– सुनील रमेश ताथोड़
एम.एस.सी.आय.टी. संचालक
”सध्या तापमान जास्त आहे या तापमानात खबरदारी शिवाय बाहेर पडले तर उष्माघात होऊ शकतो म्हणून शक्यतोवर उन्हात बाहेर पडू नये आवश्यक असेल तर सैल सुती कपडे परिधान करावे डोके कान सुती कापडाने घट्ट बांधावी डोळ्याला गॉगल लावा वा पायात बूट घालावी प्रवासादरम्यान गरज नसली तरीही शुद्ध पाणी प्राशन करत राहावे त्यामुळे उष्माघाताची शक्यता कमी होती तरीही मळमळ उलट्या डोळे डोके दुखणे ताप पोट दुखणे असा त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवावे.”
-डॉक्टर अशोक तापडिया
वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय तेल्हारा
अधिक वाचा : वाडेगांव ग्राम पंचायत व प्रशासनाचे पाण्याचे टॅंकर सुरू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola