बाळापूर(डॉ शेख चांद)– प्रविण भोटकर यांनी केली विकास कामे अतिशय चांगली असून कोणाला ही ते मदत करीत असतात आरोग्य संदर्भातील योजना ते सामान्य लोकांना मिळवून देतात .
पारस गाव हे अतिशय समृद्ध गाव असून औष्णिक विद्युत केंद्रामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे गावात सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने नांदत असून गावाच्या विकासासाठी मनोभावे प्रयत्न करून गाव स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे असा प्रविण भोटकर यांचा मानस असल्याची तळमळ प्रवीण भोटकर यांनी व्यक्त केली. पारस गावाला औष्णिक विद्युत केंद्रातून वीज पुरवठा व्हावा आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या पाणी साठ्यातून पाणी पुरवठा होण्यासाठी मंत्रालय स्तरावर त्यांचा पाठपुरावा सुरू आहे, जे काम स्थानिक आमदारांना करता आले नाही ते काम मी करून दाखवली असल्याचे प्रवीण भोटकर अभिमानाने सांगतात, पातूर- बाळापूर-पारस-लोहारा राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून निधी खेचून आणला, अनेक वर्षांपासून प्रलंबित सावित्रीबाई फुले चौक ते स्मशानभूमी रस्त्याच्या बांधकामाला औष्णिक विद्युत केंद्रातून निधी उपलब्ध करून दिला, स्थानिक कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून दिला, शिकाऊ उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून दिला,गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देऊन त्यांना नवीन जीवन देण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले,गुणवंत विद्यार्थ्यांना विमान प्रवास, महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या असे अनेक विकासात्मक काम करून माझ्या पारस जिल्हा परिषद सर्कल ला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणे हाच ध्यास असल्याचे प्रवीण भोटकर यांनी मत व्यक्त केले आहे.
अधिक वाचा : अकोट मतदारसंघावर प्रहारचा झेंडा फडकणार – आमदार बच्चू कडु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola