अकोट(देवानंद खिरकर)-अकोट तालुक्यातील ग्राम मुंडगाव ते पाथर्डी रोडवर मिळालेल्या गुप्त माहिती वरुन आज दिनाक 11 मे रोजी मुंडगाव रस्त्याने नाकाबंदी दरम्यान परमानंद गजानन आंबलकाळ वय 35 वर्ष, राजेश गजानन बूलबूले वय 28, वर्ष दोघेही राहणार मुंडगाव हे त्यांच्या ताब्यातील मोटर सायकल हिरो प्रो एम एच 30 एजी 5719 वर अवैधरित्या प्रतीबाधित विमल पान मसाला 260 पाकिट प्रत्येकी 150 चे किंमत 39000 हजार सुगंधित विमल पाऊच 260 पाकिट प्रत्येकी 30 रुपये किंमत 7800 रुपये वाहतुक करताना मिळुन आले त्यांचे ताब्यातुन वरिल माल मोटार सायकल हिरोहौंडा प्रो एम एच 30 एजी 5719 किंमत 40000 हजार रुपये असा एकुण 86800 रुपयेचा माल पंच्यासमक्ष घटनास्थळा पंचनामा जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त केले आणी पुढिल कारवाई करिता अन्न व औषध प्रशासन अकोला यांच्याशी सम्पर्क करण्यात आला.सदरची कारवाई मा उपवीभागिय पोलिस अधिकारी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीणचे ठानेदार ज्ञानोबा फ़ड,गुन्हे शोध पथकाचे नारायण वाडेकर,अनिल सिरसाट,प्रवीण गवळी,गजानन भगत,यांनी केली आहे.