• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

खराब अन्नापासून बनविला घरगुती गॅस

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
मेड इन अकोला
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)– खराब, शिळे झालेले अन्न आणि पालेभाज्यांपासून घरगुती गॅस तयार करता येऊ शकतो, यावर आपला विश्वास बसणार नाही. परंतु, अकोल्यातील तोष्णीवाल कुटुंबाने ही किमया केली असून गेल्या दहा वर्षांपासून ते घरगुती गॅस वापरत आहेत. त्यामुळे त्यांना वर्षातून केवळ दोनच सिलिंडर बाहेरून विकत घ्यावे लागतात. परिणामी सिलिंडरची दरवाढ झाली काय आणि न झाली काय? याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. ‘वेस्टपासून बेस्ट’ फार्मूला तयार करण्यात तोष्णीवाल कुटुंब अग्रस्थानावर आहे.

तोष्णीवाल कुटुंबीयांचा गॅस निर्मितीचा हा प्रयोग अनेकांनी बघितला आहे. बऱ्याच ठिकाणी या प्रयोगाचा वापरही सुरू झाला आहे. सिलिंडरची दरवाढ ही आपल्या घराचे आर्थिक बजेट बिघडवत असते. वेळेवर न मिळणारे सिलिंडर हे नेहमीच डोकेदुखी ठरत असते. ऑनलाइन सिलिंडर पद्धती जरी झाली असली तरी ती अद्यापही यशस्वी झाल्याची दिसून येत नाही. या सर्व अडचणींमुळे इच्छा नसतानाही आपल्याला सिलिंडरवर अवलंबून राहावे लागते. आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या सिलिंडरचा आपण पीच्छा सोडू शकत नसल्यासारखी परिस्थिती आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

या सर्व डोकेदुखीवर तोष्णीवाल लेआउटमध्ये राहणारे अशोक तोष्णीवाल यांच्या कुटुंबाने उपाय शोधला आहे. घरातील शिळे, खरकटे अन्न आणि पालेभाज्या, फळे यांची टरफल वापरून गॅस तयार करण्याची किमया या कुटुंबाने शोधून काढली आहे. त्यांचा हा प्रयोग ते स्वतः गेल्या दहा वर्षांपासून घरी उपयोगात आणत आहेत. ज्याप्रमाणे आपण सिलिंडर घरी आणून नियमित आवश्यक ते अन्न शिजवतो. तसेच अन्न या घरगुती गॅसवर ते सहज आणि त्याच पद्धतीने शिजवतात. त्यामुळे दर महिन्यातील गॅसची बचत ते करीत आहेत. वर्षभरात त्यांना फक्त दोन वेळा बाहेरून गॅस सिलिंडर विकत आणावा लागतो.

घरगुती गॅस तयार करण्यासाठी त्यांनी छतावर दोन मोठ्या पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या उभारून त्यात गॅस तयार करता येईल, अशा पद्धतीने काही साहित्यांची उभारणी केली. हे साहित्यही फार महागडे किंवा दुर्मिळ नसून सहज उपलब्ध होतील अशा या साहित्य मधून हा गॅस तयार झाला आहे. हा गॅस घरगुती पदार्थ शिजवण्यासाठी उपयोगी येऊ शकतो. सिलिंडर गॅसप्रमाणेच या गॅसचीही ज्वाला राहते. यासाठी आपल्याकडे असलेले शिळे, खरकटे अन्न तसेच फळ भाज्या यांची टरफलही आपण उपयोगात आणू शकतो. यासाठी फार मोठा खर्च आपल्याला लागत नाही अवघ्या पंधरा ते वीस हजार रुपयात घरातच गॅस सिलिंडर बनविण्याचा घरगुती कारखाना तयार होऊ शकतो.

अधिक वाचा : ईसापूर येथे युगप्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोल्यातील प्रॉपर्टी ब्रोकर हत्या प्रकरण; तीन आरोपी पोलिसांना शरण

Next Post

महागाई वाढणार; निवडणुकीनंतर पेट्रोल दरवाढ?

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
petrol

महागाई वाढणार; निवडणुकीनंतर पेट्रोल दरवाढ?

मिस यू मिस्टर

‘मिस यू मिस्टर’ चित्रपटात सिद्धार्थ-मृण्मयी झळकणार एकत्र

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.