बेलखेड (प्रतिनिधी): काल दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बेलखेड येथे अकोली रोडला तिसऱ्या कॅनल जवळ प्रथमच पाणी फाउंडेशनचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी गावातील जलमित्र कोऑर्डिनेटर श्याम गिऱ्हे यांच्या मुख्य संकल्पने खाली बेलखेड मित्र मंडळ व समस्त गावकऱ्यांच्या वतीने श्रमदान करण्यात आले व पाण्याच्या बचतीविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. यापुढे सुद्धा पाणी फाउंडेशनचे विविध उपक्रम बेलखेड गावामध्ये येत्या काळात राबविण्यात येतील.
यावेळी गडचिरोली येथे झालेल्या भ्याड नक्षलवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीष देऊळकार तर प्रास्ताविक पवन तायडे यांनी केले.
अधिक वाचा : तेल्हारा भाजयुमो तालुकाध्यक्ष सतीश जयस्वाल यांच्या वाढदिवशीे पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करून केला वाढदिवस साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola