तेल्हारा(प्रतिनिधी)- गेल्या आठ दिवसात तेल्हारा तालुक्यात तरुणांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असून आज तेल्हारा येथील २७ वर्षीय युवकाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याने तालुका आत्महत्येच्या घटनांनी हादरला आहे.
शहरातील बजरंग चौक येथे राहणाऱ्या योगेश राऊत वय २७ याने आपल्या स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. यावेळी आत्महत्या केल्याची बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच एकच गर्दी जमली होती. तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व योगेशचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. योगेश हा होतकरू व मेहनती तरुण होता वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यु झाला तर दोन बहिणीचे लग्न गेल्या काही वर्षापूर्वी झाल्याने घरी आई आणि तो असा त्याचा परिवाराचा गाडा सुरू होता. योगेश व त्याची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. योगेशने आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस करीत आहेत.
तेल्हारा तालुक्यात गेल्या आठ दिवसात चार तरुणानि आत्महत्या केल्याने तालुका हादरला असून शहरातील एका तरुणाने तसेच सिरसोली येथील एकाने, भांबेरी येथील एकाने आणि आज तेल्हारा येथील योगेश राऊतने आत्महत्या केल्याने आत्महत्येचे सत्र थांबता थांबेनात असे चित्र निर्माण झाले आहे. जवळपास हे चारही तरुण एकाच वयोगटातील असल्याने आणि अविवाहित असल्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अखेर नागरिक आत्महत्ये मागचे तर्कवितर्क काढीत असून मात्र एवढ्या टोकाची भूमिका तरुण वर्ग घेत असल्याने तालुक्यातील जनता अवाक झाली आहे.
अधिक वाचा : भांबेरी येथील शेतकरी युवकाची कर्ज बाजारिपणाला कंटाळून आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola