अकोला : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेराविरुद्ध मुंबईच्या डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाने तक्रार दाखल केली आहे. त्याने आरोप केला आहे की, व्हिडीओ बनवत असताना सलमान आणि शेराने त्याला मारहाण केली.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, सलमान संध्याकाळी डीएन नगरच्या भागात सायकल चालवत होता. याचदरम्यान एक तरुण त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करू लागला. तो सुमारे 20 मिनिटे सलमानचा व्हिडीओ बनवत राहिला. मात्र त्यांनतर एकाएकी सलमानला खूप राग आला. सलमानने रागात जबरदस्ती त्याचा मोबाइल पकडला. याव्यतिरिक्त सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने त्याला मारहाणही केली.
या घटनेनंतर पीडित तरुणाने डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये सलमान आणि शेरा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपस करत आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
अधिक वाचा : अकोला देशात ‘हॉट’; तापमान ४५.१ अंश सेल्सिअस
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola