अकोला (प्रतिनिधी)- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या २५ मार्च रोजी दहीहंडा पोलीस ठाण्यात कार्यरत २ पोलीस कर्मचााऱ्याना लाचे ची माँगणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांच्या तक्रारीची खातरजमा करून लाच मागणी केल्याचे खात्री लायक झाल्याने त्याच आधारे आज महिना भरानंतर त्यांतील एक पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे . तर दुसरा निवडणूक कार्यात बाहेरगावी असल्याने त्याला अद्याप अटक नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तक्रारकर्ता पुरुष, ३४ वर्ष, रा.अकोला, व्यवसाय शेती व रेती वाहन यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २५ मार्च रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती त्या तक्रारीची खातरजमा त्याच दिवशी करण्यात आली.
तक्रारदास अवैध वाळू वाहतूक केली म्हणून गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्याची भीती दाखवूत, तक्रारदारास व त्याचे सहकारी यांना सुमारे चार ते पाच तास थांबवून ३०००० रु लाचेची मागणी करून ११००० रु तक्रारदारकडून घेतले व उर्वरीत लाचेच्या रकमेची मागणी आलोसे करीत असल्याने आरोपी लोकसेवक १) दिनेश जगदेव राव सोळंके, वय ३३ वर्ष, पो.ना.ब. न. १९२८, वर्ग ३,पोलीस स्टेशन दहीहंडा रा.अकोला, मंगेश खेडकर, पो.शी. ब. न. १५२१,नेमणूक पोलीस मुख्यालय, वर्ग ३,रा.अकोला यांनी लाच मागणी रक्कम तडजोडीनंतर – १२००० हजार रुपये घेतल्या चे उघड झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डोंगरर्दीवे लाच लुचपत विभाग अमरावती परिक्षेत्र, अमरावती। – गोर्ले, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक चव्हाण, स्टाफअकोला व शासकीय पंच यांनी ही कारवाई केली आहे
या कारवाईत आरोपी क्र १ यास ताब्यात घेण्यात आले असून,आरोपी क्र २ निवडणूक बंदोबस्तासाठी बाहेरगावी असल्याने मिळून आला नाही त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अधिक वाचा : बाळापूर पोलीस स्टेशनची अशीही पक्षी सेवा, कडक तापमानात पक्षां साठी केली पाण्याची व्यवस्था
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola