अकोला(प्रतिनिधी)– बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शालेय विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधम शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
बाळापूर पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा सात वर्षिय मुलगा सरकारी शाळेत शिकायला जात होता. तिथे कार्यरत शिक्षक प्रवीण भास्कर खंडारेने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी त्या मुलाची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी शिक्षकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७, पोक्सो कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मनीषा राऊत यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाकडून सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नराधाम शिक्षकास शनिवारीच दोषी ठरविले होते.
शनिवारी वेळेअभावी दोषी शिक्षकास शिक्षा सुनावल्या गेली नाही. सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील शिक्षकास भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ अन्वये १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
अधिक वाचा : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलणे पडले महागात,युवकाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola