वाडेगांव (डॉ शेख चांद) – येथील ग्राम पंचायत जवळ रहाणारे कवी अशोक दशमुखे यांच्या सप्तरंगी तोरण या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दि २० एप्रील शनिवार ला सकाळी १० : ३० वाजता श्री जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय वाडेगांव येथे संपन्न झाला असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. किशोर जी बळी टि व्ही कलाकार अकोला, शांतारामजी खराटे शेगांव, किशोरकुमारजी मिश्रा शाखा अभियांता सार्वजनीक बांधकाम शेगांव, बापु साहेब कासार, आवटे महाराज , संस्था अध्यक्ष संतोष दादा मानकर, अरूण कुळकर्णी सर, प्रकाशिका सौ मिना जवादे, अरविंद शेलार , डॉ हिम्मतराव घाटोळ, शिवशंकरजी चिकटे, संतोष दादा कोकाटे, शाम ठक , पुष्पराज गावंडे, रविंद्र जवादे, वनिताताई गावंडे, प्रकाश कंडारकर, हिम्मत ढाळे, अरविंद भोंडे, केशव नागापुरे, नरेंद्र जकाते, अरुण ढोणे, राधिका देशपांडे, नितीन वरणकार, विश्वास राव देशमुख , मुक्त पत्रकार देशमुख, सांगुनवेढे सर, पेंटर देशमुख, निलेश कवडे, इश्वर मते, संदीप देशमुख , इत्यादी उपस्थीत होते. यावेळी उपस्थीत मान्यवरांनी आपले मनोगत तसेच कवींनी कविता सादर केल्या. किशोर बळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगीतले की कवी अशोकराव दशमुखे यांचा सप्तरंगी तोरण खरोखरच खुप सुंदर आहे. तसेच प्रत्येक मानुस हा समान आहे जात, पात, धर्म, पक्ष, उच निच, गरीब, श्रीमंत, हे न पहाता प्रत्येक व्यक्तीने सर्वाना एक समान वागणूक दिली पाहीजे, तसेच उपस्थीत सर्वांना पोट भरुण हसवले .
कार्यक्रमाचे आयोजक गोपाल दशमुखे सर, संजय कथले सर, सुत्रसंचालन प्रा. उदयजी कथले, पल्लवी देशमुख यांनी केले. प्रस्तावीक अमोल गोंडचवर यांनी तर आभार गोपालराव दशमुखे सर यांनी केले.
अधिक वाचा : सौन्दळा येथे जीवदया, शाकाहरी संघाचा यात्रेकरुशी संवाद साधत केली जनजागृती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola