• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांचा वॉर रूममध्ये तळ, तक्रारींचा केला निपटारा

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
जिल्हाधिकाऱ्यांचा वॉर रूममध्ये तळ, तक्रारींचा केला निपटारा
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)  – निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांच्या कार्यालयात तयार केलेल्या वॉर रूममध्येच गुरुवारी संपूर्ण दिवस तळ ठोकला होता. प्रत्येक घडामोडीवर त्यांनी बारीक लक्ष ठेवले. तसेच कुठल्याही तक्रारीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या तक्रारी तत्काळ निकाली काढण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. प्रत्येक मतदान केंद्रावरील आढावाही त्यांनी या रूममध्ये बसून घेतला.

मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, तेव्हापासून तर सायंकाळी मतदान प्रक्रिया बंद होईपर्यंत तीन तक्रारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये पळसो बढे येथील कृष्णा बढे हे जिवंत असतानाही यांचे नाव मतदार यादीत नसणे, त्यांचे नाव मतदार यादीत डिलीट झाल्याबाबतची तक्रार होती. या तक्रारी बाबत सविस्तर अहवाल आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करून त्यासंदर्भातील प्राथमिक अहवाल आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. तर दुसरी तक्रार ही बाळापूर तालुक्यातील कवठा येथील मतदान केंद्रावरील आहे. येथे श्रीकृष्ण घ्यारे यांनी बॅलेट युनिटची तोडफोड केली. उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तिसरी घटना ही अकोला पूर्व मतदारसंघात गुडधी येथील 136 मतदान केंद्रावर व्हीव्हीपीपॅट मशीन बंद झाल्यामुळे ते मशीन तातडीने बदलण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पापळकर यांनी दिली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मतदान सुरू झाल्यानंतर 10 बियू आणि 10 सीयू आणि 24 व्हीव्हीपॅट, आशा 1 टक्के मशीन बदलाव्या लागल्या. तर मोकपोलदरम्यान 24 बियू, 26 सीयू आणि व्हीव्हीपट 63 मशीन बदलाव्या लागल्या. दिव्यांग मतदार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 50 टक्क्यांच्यावर त्यांची मतदान येत आहे. मतदान संपल्यानंतरची एकूण मतदानाची आकडेवारी ही आमच्याकडे असलेल्या ट्रेंड आणि झोनल अधिकारी यांच्या माहितीच्या आधारे 60 टक्केदरम्यान मतदान राहील, असा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला आहे. मशीन बदलण्याचा कालावधी एक तासाच्या आत एकाच ठिकाणी बदलण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणी त्यानं 15 मिनिटात बदलण्यात आल्या आहेत. मतदार यादीत नावे नसल्याच्या तक्रारी अनेक मतदान केंद्रांवरून आल्या आहेत. त्यांना 1950 क्रमांकावर सम्पर्क साधून तक्रारी नोंदविण्याचे सांगून आपले नाव तपासून घावे, नाव नसल्यास फॉर्म 6 नंबर भरून पुढच्या निवडणुकीसाठी आपले नाव नोंदविता येईल. पोस्टल बलेट हे 23 मेच्या पहाटे 6 वाजेपर्यंत येत राहणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

अधिक वाचा : उत्कृष्ट जिल्हाधिकाऱ्यांचा बहुमान मिळाल्याबददल जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

bigg boss marathi 2: मे महिन्यात सुरू होणार ‘बिग बॉस मराठी २’?

Next Post

राग सहन न झाल्याने मुलानेच केली बापाची हत्या

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
हत्या

राग सहन न झाल्याने मुलानेच केली बापाची हत्या

raj-thackeray

मोदी जिंकल्यास तुम्ही गुलाम : राज ठाकरे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.