अकोला : लोकसभा निवडणूक प्रचारातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं वातावरण तापलेलं असतानाच आज भाजपचे प्रवक्ते जीवीएल नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट फेकण्यात आला. साध्वी प्रज्ञा यांचा भाजपप्रवेश व त्यांना भोपाळमधून देण्यात आलेल्या उमेदवारी संदर्भात माहिती देत असताना हा प्रकार घडला. संबंधित व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात ही घटना घडली. बूट फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव शक्ती भार्गव असं असून तो व्यवसायानं डॉक्टर असल्याचं समजतं. भार्गव यानं बूट फेकल्यानंतरही राव यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पत्रकार परिषद सुरूच ठेवली.
भाजपनं या घटनेचा निषेध केला आहे. ‘बूट फेकणाऱ्या व्यक्तीनं एखाद्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे. हे अत्यंत चुकीचं वर्तन असून लोकशाहीच्या विरोधात आहे,’ असं भाजप प्रवक्ते नलीन कोहली यांनी स्पष्ट केलं.
अधिक वाचा : मतदान करताना फेसबुक लाईव्ह, चौघांविरोधात गुन्हा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola