- तेल्हारा (विशाल नांदोकार)- ही लोकसभा निवडणूक विकासाची व राष्ट्रीय अस्मितेचे आहे, त्यामुळे नागरिकांनी विकासासाठी व राष्ट्रीय अस्मिता जपण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप-शिवसेना व मित्र पक्षाचे अकोला लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी सोमवारी तेह्वाऱ्यात आयोजित जाहीर विजय संकल्प सभेत ते बोलत होते.
या जाहीर सभेच्या व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर,माजी आमदार जगन्नाथ ढोणे, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, वसंतराव खोटरे,माजी आमदार संजय गावंडे यांच्यासह भाजप व मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मागील साठ वर्षात जेवढा विकास झाला नाही, त्याहून जास्त विकास गेल्या पाच वर्षांमध्ये देशात झालेला आहे. गरिबांच्या विकासासाठी काँग्रेसने फक्त गप्पा केल्या परंतु गरिबांच्या विकासासाठी विविध योजना राबवून गरीबी मिटविण्याचे खरे प्रयत्न हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकारने केले. उज्वला योजना, जनधन योजना यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून गरिबांपर्यंत विकास पोहोचविला. संपूर्ण देशात दर्जेदार महामार्गांचे निर्माण कार्य सुरू आहे. 98 टक्के नागरिकांच्या घरात शौचालयांची निर्मिती झाली. अनेक बेघर लोकांना स्वतःची हक्काची घरे मिळाली. तेल्हारा तालुक्यात खासदार संजय धोत्रे यांच्या प्रयत्नाने नरेंद्र मोदी ना. नितीन गडकरी व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासाच्या योजना राबविल्या गेल्या. भविष्यातही अकोल्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यासाठी भाजपच्या पाठीशी नागरिकांनी खंबीरपणे उभे राहून या निवडणुकीत संजय धोत्रे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन सलग चार वेळा खासदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंदवावा. असे आवाहन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. देशाच्या विकासासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही नरेंद्र मोदी यांनी देशाची शान वाढविणारे मोठे कार्य केलेले आहे. वारंवार कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला चांगला धडा शिकविला आहे. यापुढेही भाजप सरकार विकासाचे आणि राष्ट्रीय अस्मितेचे हे कार्य असेच पुढे चालू ठेवेल. म्हणूनच ही निवडणूक विकासाची आणि राष्ट्रीय अस्मितेची आहे. नागरिकांनी भाजपच्या पाठीशी उभे राहून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भाजप सरकार स्थापण्यासाठी अकोल्यातून संजय धोत्रे यांना निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी बोलताना खा. संजय धोत्रे म्हणाले की पूर्वी आपण विरोधी पक्षाचे खासदार होतो, त्यामुळे कामे करण्यात अडचणी येत होत्या. परंतु गेल्या पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून या निधीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यापुढेही ही विकासाची कामे अशीच मोठ्या प्रमाणात सुरू राहतील. शहरातील श्री शिवाजी हायस्कुल शाळेच्या मैदानावर आयोजित या जाहीर सभेला तालुकाभरातून हजारो नागरिक जमले होते.
अधिक वाचा : उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तेल्हा-यात विजय संकल्प सभा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola