वाडेगांव (डॉ शेख चांद)- येथील युसुफ खान सुभान खान पठाण हे दि १५ एप्रिल २०१९ पासून ग्राम पंचायत कार्यलय समोर आमरण उपोषणाला बसनार असल्या बाबत चे पत्र ग्राम पंचायत सरपंच / सचिव वाडेगांव, मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अकोला, तहसिलदार बाळापूर, गटविकास अधीकारी बाळापूर, पोलीस निरीक्षक पो . स्टे . बाळापूर यांना दिले आहे .
वाडेगांव येथे पाण्याच्या भिषन टंचाई बाबत ग्राम पंचायत कार्यलय मध्ये अनेक आंदोलने , मोर्चे, ग्राम पंचायत ला कुलुप लावले, तोडफोड शुद्धा झाली या साठी काही सुजान नागरीकांवर पाण्यासाठी आंदोलन करतांना प्रशासना कडून फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत . तरी ही सध्या सत्तेवर असलेल्यांनी अजुन पर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. या साठी वाहेगांव येथील सामाजीक कार्यकर्ते वाय एस पठाण सर यांनी २८ जानेवारी रोजी पाणी पुरवठा ३० ते ४० दिवसांनी का होतो या विषयी माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहीती मिळवली आहे . त्यामध्ये मुद्दा क्र ६ वाडेगांव मध्ये आज रोजी च्या लोकसंख्ये प्रमाने १० लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून फक्त ३लाख लिटर पाणी प्रति दिन उपलब्ध असून सुद्धा या माहीतीच्या आधारे किमान ५ व्या दिवसी नळाला पाणी यायला हवे. परंतू आज ही ३० ते ४० दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे.
दि १४ एप्रील पर्यंत ग्राम पंचायत प्रशासनाने कमीत कमी ५ व जास्तीत जास्त ८ दिवसांनी नियमित पाणी पुरवठा केला नाही तर १५ एप्रील २०१९ पासून युसुफ खान पठाण ग्राम पंचायत समोर ह्याच पुर्व सुचने नुसार सकाळी १० वाजता आमरण उपोषणाला बसणार या दरम्यान जिवीत्वाला काही धोका निर्माण झाल्यास संपुर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील . तसेच या उपोषणाला संपुर्ण गावकरी पाठींबा देतील अशी ही चर्चा आहे. आता प्रशासन काय भुमीका घेते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.