वाडेगाव(डॉ शेख चांद)- जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय केंद्र शाळा वाडेगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करा करण्यात आली.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री.समाधान सोर,तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री.ज्ञानेश्वर पुंडकर,पदवीधर शिक्षिका सौ.उज्वला जोशी,सौ.अर्चना गोमासे ह्या होत्या . तसेच शाळा व्यवस्थापन समीती चे पदाधीकारी , सदस्य कार्यक्रला उपस्थीत होते . कार्यक्रमाच्या सुरवातीलाच मान्यवरांच्या हस्थे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ.अनुराधा शेंडे ह्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा जीवनपरीचय,त्यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष, दलितांसाठी केलेले कार्य ह्यावर सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. सोबतच शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विषयी आपल्या भावना त्यांच्या छोटेखानी भाषण व गीताद्वारे प्रगट केल्या.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेतील विज्ञान विषय शिक्षका सौ.योगिता खोपे वाडकर ह्यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सविता कुटेमाटे ह्यांनी केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी सहकार्य केले.











