तेल्हारा / हिवरखेड रूप (विशाल नांदोकार) : ग्रामीण भागात विविध रोगांनी थैमान घातले असून हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र समस्यांनी ग्रस्त असल्याने सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे.
तेल्हारा तालुक्यात हीवरखेड सर्वात मोठी बाजापेठ असून सुमारे 40000 लोकसंख्या आहे. हिवरखेड तथा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सदर केंद्रा अंतर्गत अनेक गावांचा समावेश आहे. आर्थिक दुर्बल गरीब गरजू रुग्णांना उपचाराकरिता गावातील आरोग्य केंद्रा शिवाय पर्याय नसतो. मात्र हिवरखेड चे प्राथमिक आरोग्य केंद्राच अनेक दिवांपासून चक्क आजारी आहे. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दोन आरोग्य केंद्राचा प्रभार असल्याने त्यांना कसरत करावी लागत असून त्याचा परिणाम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजावर होतो.
रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तातडीने एखाद्या रुग्नास भरती करावयाचे असल्यास मोठी समस्या निर्माण होते . बहुतांश वेळा डॉक्टर उपलब्ध नसतात. जीव धोक्यात घालून बाहेरचा रस्ता धरावा लागतो. महिला रुग्णांची तर नेहमीच कुचंबणा होते. आरोग्य केंद्रातील समस्ये संदर्भात जागरूक नागरिकांनी अनेकवेळा वरिष्ठांच्या कानावर टाकले मात्र ‘बधीर’ यंत्रणेचे साफ दुर्लक्ष होत आहे.
108 रुग्णवाहिका वाढविणे आवश्यक
आजपर्यंत 108 रुग्णवाहिकेचा विचार केल्यास हिवरखेड येथील 108 रुग्णवाहिका नेहमीच व्यस्त असते. येथे अनेक गावे जोडलेली असल्यामुळे येथे कमीत कमी दोन 108 नवीन रुग्णवाहिकांची नितांत आवश्यकता आहे. परंतु नवीन 108 रुग्णवाहिका तर सोडाच आहे ती एकच रुग्णवाहिका बरेचदा नादुरुस्त असल्यामुळे इतर ठिकाणाहून रुग्णवाहिका येण्यास उशीर होतो. परिणामी गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात येत असतो. त्यामुळे येथे तात्काळ दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून वारंवार उमटत आहे.
पूर्णवेळ निवासी वैद्यकीय अधिकारी हवा
पूर्वी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ चव्हाण, डॉ तायडे आणि डॉ दारोकार असे तीन डॉक्टर नियुक्त होते त्यावेळेस नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत होत्या.
पण डॉ. तायडे त्यांनी नोकरी सोडल्यामुळे आणि डॉ. चव्हाण ह्यांच्याकडे अडगांव प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य जबाबदारी असल्यामुळे ते बहुतांश वेळा अडगाव येथेच असतात. त्यामुळे हिवरखेड चा भार एकट्या डॉ दारोकार यांच्यावर राहतो. त्यामुळे येथे एकही एमबीबीएस डॉक्टर हजर राहत नसल्याने पोलिसांनी एमएलसी करीता आनलेल्या व्यक्तींना आणि इतर महत्त्वाच्या रुग्णांना सुद्धा इतरत्र रेफर करावे लागते.
त्यातल्या त्यात डॉक्टर दारोकार सुट्टीवर असल्याने संपूर्ण प्राथमिक केंद्राची अवस्था रामभरोसे होते. व रुग्णांना अनेक हाल-अपेष्टांचा सामना करावा लागतो.
त्यामुळे येथे कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
अबब एवढी रिक्त पदे ???….
वैद्यकीय अधिकारी 2
औषध निर्माण अधिकारी 1 परिचर 2
आरोग्य सेविका 1
आरोग्य सेवक 3
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1
आरोग्य सहाय्यक 1
एका प्राथमिक आरोग्य केंद्रात एवढे पदे रिक्त असल्यामुळे हिवरखेड येथील संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रच निराधार झाले आहे असेच चित्र दिसत आहे..
विशाल नांदोकार
अधिक वाचा : वाडेगावत महात्मा फुले जयंतीनिमित्त शोभायात्रा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola