तुलुंगा बु(प्रतिनिधी)– क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तुलंगा बु. अकोला जिल्हा आँल इंडिया कार्यरत (रंजि.नं:-महाराष्ट् २५९/२०१८) यांच्या मार्फत विनम्र अभिवादनाचा क्रार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व गावात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्या निमित्ताने संस्थेच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तुलंगा बु येथील सार्वजनिक विहिरी मधिल उपसा काढुन विहिरी मधिल काडी कचरा काढुनी पाणी मोकळे केले व संध्याकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने मार्गदर्शनासाठि लाभलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.सतिश देवराव हातोले, हे उपस्थित होते व मा. शुभम रोकडे (सचिव) यांनी संचालन केले व आभार प्रदर्शन मा.मुकेश हातोले (सदस्य) यांनी व मा. अक्षय हातोले (सदस्य) यांनी गाण्यांनी लोकांचे प्रबोधन केले व उपस्थित मंडळी म्हणून लाभलेले मा.प्रभाकर अंभोरे (उपाध्यक्ष), मा.श्रीकृष्णा हातोले(सहसचिव),मा सुरेश काका हातोले,मा.शुभम कचाले, मा.बेबाबाई हातोले, विहिरीतील उपसा काढण्यास सहकार्य करणारे मा.विजय अवचार (कि.मु.मोर्चा .ता.अध्यक्ष) मा.सागर हातोले (ब.मु.मोर्चा ता.अध्यक्ष) यांनी सहकार्य केले
अशाप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
अधिक वाचा : बेलखेड येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola