एंटरटेन्मेंट डेस्क : कतरिना कैफ दक्षिणेत पदार्पण करू शकते, अशी उद्योगात बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी निर्मात्यांनी तिला सुपरस्टार महेश बाबूसोबत घेतले होते मात्र तिने तो प्रस्ताव नाकारला. आता दक्षिणेचे दिग्दर्शक अनिल रविपुडी यांच्या चित्रपटावर कॅटने स्वाक्षरी केल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानसोबतच्या चित्रपटानंतर कॅटरिनाने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. मात्र अनेक चित्रपट निर्मात्यांसोबत तिची चर्चा सुरू आहे, परंतु अद्याप कोणत्याही प्रकल्पाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. आता कॅटरिना अनिलची ऑफर स्वीकारते की नाही ते लवकरच कळेल.’
चोखंदळ आहे कॅट
सध्या कतरिना आपल्या प्रॉडक्शन हाउसला लाँच करण्यात गंुतली आहे. त्यामुळे ती निवडक चित्रपट करत आहे. शिवाय तिचे मागील दोन चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आणि ‘जीरो’ फ्लॉप झाले होते. त्यामुळे ती निवडक चित्रपट करत आहे. यावर्षी अपयश चाखायचे नाही, असे ती नुकतीच म्हणाली होती.
आधी केले आहेत दोन चित्रपट
कतरिनाने जर या िचत्रपटासाठी होकार दिला तर हा तिचा तिसरा दाक्षिणात्य चित्रपट असेल. 2003 मध्ये अमिताभ बच्चनसोबत तिने ‘बूम’ मधून पदार्पण केले होते. मात्र तो फ्लॉप ठरला होता. यानंतर कॅटरिनाने वँकटेशसोबत दुसरा चित्रपट ‘मल्लिस्वरी’ केला होता. याशिवाय तिने नंदामुरी बालाकृष्णासोबत तेलुगू ‘अल्लारी पिद्दुगु’ मध्ये काम केले आहे.
काम करायला तयार आहेत महेश बाबू
कॅटने महेश बाबूसोबत काम करायला आधी नकार दिला होता. मात्र महेश बाबू तिच्यासाेबत काम करायला आताही तयार आहेत. म्हणून निर्मातेदेखील या जोडीला घेऊ इच्छित आहेत.
अधिक वाचा : महेंद्रसिंग धोनी याआधी ‘असा’ वागलाच नव्हता !