बेलखेड (प्रतिनिधी): दिनांक 11 एप्रिल रोजी बेलखेड येथे क्रांतीसुर्य युवा मंच व बेलखेड मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९२ वी जयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी सायंकाळी स्थानिक सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे महेश दादा गणगणे (जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस, अकोला) यांनी ज्योतीबांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक समारोहाचा नारळ फोडला. यावेळी क्रांतीसुर्य युवा मंच संस्थापक अध्यक्ष हेमंत नागपुरे, महात्मा फुले उत्सव समिती अध्यक्ष पवन तायडे, तंटामुक्ती अध्यक्ष विकीदादा नागपुरे, बाळूभाऊ निमकर्डे, गजाननभाऊ वानखडे, प्रफुल उंबरकार, श्याम गिर्हे, घनश्याम दाते, संतोष चोपडे, संजयभाऊ भोपळे, शिवा राखोंडे, तेजस घाटे, हरिओम वानखडे, प्रफुल्ल खिरोडकार, संतोष भड, हर्षल नागपुरे, शुभम नागपुरे, वैभव उगले, आकाश अरुडकार, राम धुमाळे, प्रज्वल बुरघाटे, वैभव अरुडकार, कौस्तुभ कुलकर्णी व मित्रपरिवार व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिरवणूक व शोभायात्रा रथ गावातील मुख्य रस्त्यांनी जाऊन ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली.मिरवणुकीला हिवरखेड पो. स्टे. चे सहायक निरीक्षक सोमनाथ पवार यांनी भेट देऊन त्यावेळी ज्योतीबांच्या प्रतिमेचे पूजन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मित्रपरिवार व गावकऱ्यांचे योगदान लाभले..!!
अधिक वाचा : अडगाव बु. येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola