जयपूर: जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं विजय मिळवला. पण मैदानात नेहमीच शांत असलेल्या धोनीचा कधी नव्हे तो या लढतीदरम्यान संयम सुटला आणि त्यानं मैदानात घुसून थेट पंचांशीच हुज्जत घातली. त्यामुळं त्याला मानधनाच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
चेन्नई आणि राजस्थान यांच्यात अटीतटीची लढत झाली. अखेरच्या षटकापर्यंत धोनी मैदानात होता. शेवटच्या षटकात १८ धावांची गरज होती. पण तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला आणि तो तंबूत परतला. उर्वरित ३ चेंडूंत चेन्नईला विजयासाठी ८ धावांची गरज होती. मिशेल सँटनर स्ट्राइकला होता. राजस्थानच्या स्टोक्सनं फुलटॉस चेंडू फेकला. पंचांनी नो बॉल दिला. पण स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या पंचांनी हा निर्णय बदलला आणि चेंडू योग्य ठरवला. याबाबत फलंदाज रवींद्र जडेजा आणि मिशेल सँटनर यानं पंचांना विचारणा केली. मैदानातच वाद सुरू झाला. तंबूत परतलेला धोनी हे सगळं पाहत होता.
अखेर धोनी मैदानात घुसला आणि त्यानं पंचांशी हुज्जत घातली. आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं त्याला दोषी ठरवलं आणि सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला.
अधिक वाचा : 10 राज्यांमध्ये निवडणूक पूर्ण; पहिल्या टप्प्यात सरासरी 68.7% मतदान, 2014 पेक्षा 6% कमी
Comments 1