वाडेगाव (प्रतिनिधी)- बाळापुर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आंतरराष्ट्रीय शाळेला महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०१९ चा राज्यस्तरीय सर्वांगसुंदर शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आपल्या प्रयत्नातुन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सर्वात्रिकरणासाठी आपण प्रयत्न करत आहात व यातुन उद्याचा भारत निर्माण करणारे सक्षम नागरिक घडवत आहात या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षण पॅनलच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सर्वांगसुंदर शाळा पुरस्कार २०१९ साठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आंतरराष्ट्रीय शाळेची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार ३१ मे रोजी तापडिया नाट्यमंदिर निरालाबाजार औरंगपुरा औरंगाबाद येथे सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या बाबतचे पत्र निवड समितीचे रितेश निलेवार, निवृत्ती राऊत यांनी ११ मार्च रोजी शाळेत येऊन मुख्याध्यापक समाधान सोर सर तसेच उपस्थीत सर्व मान्यवर यांना दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष डॉ . शेख चाँद, शिक्षक ज्ञानेश्वर पुंडकर, उज्वला जोशी, सुनंदा जावरकर, ज्योती राठोड, साधना गोतमारे, अर्चना गोमासे, संगीता हाडोळे, रवींद्र तायडे, सुरेखा तायडे,अनिल धोत्रे, सुनिता काठोळे, अनुराधा शेंडे, सविता कुटेमाटे, रामदास वाघ, सोनल देशमुख, गजानन लांबटोगळे, मंदा चव्हाण, सुधीर घाटोळ, योगिता खोपे, विवेकानंद वाकोडे, अश्विन कंडारकर, रूपाली तळेकर , भारत राठोड, शाळा व्यवस्थापण समीती सदस्य सुबोध घ्यारे.श्रीकृष्ण घाटोळकर, सुरेखा बावणे.गजानन खोडके, महानंदा जंजाळ, शारदा गावंडे, संगीता सरकटे, वंदना टेकाम, संदीप घाटोळ, माणिकराव मानकर, कर्मचारी संपत वाघ,विशाल अवचार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा : वाडेगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थ त्रस्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola