भांबेरी(योगेश नायकवाडे)- सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेच्या चौथ्या पर्वात तालुक्यातील मनब्दा गावात पाणी फाऊंडेशनचे तुफान आले आहे. गावातील आबालवृद्ध महिला पुरुष श्रमदानात हिरीरीने भाग घेत आहेत. नव्याने लग्न झालेल्या भुषण व रोषणी या नवदाम्पत्याने आपल्या लग्नाच्या दुसर्याच दिवशी सकाळी शिवार गाठून बांधावर जोड्याने श्रमदान केले.
तालुक्यातील मनब्दा ग्रामस्थांनी शेत शिवारात श्रमदान करून पाणी फाऊंडेशनच्या विविध उपाययोजना राबवून गतवर्षी सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला होता. त्या दरम्यान गावकऱ्यांनी लोकसहभाग व जनजागृती पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवार जलमय व हिरवेगार केले. त्याकामात राहिलेली कसर काढण्यासाठी गाव पुन्हा या वर्षी जोमाने कामाला लागल्याचा प्रत्यय 9 एप्रिल ला लग्न झालेल्या भुषण व रोषणी या नवदाम्पत्याच्या लग्नाच्या दुसर्याच दिवशी लग्न समारंभातील विधी बरोबरच श्रमदानाला महत्त्व देण्यावरून दिसून येते. येथील भुषण श्रीकृष्ण पाथ्रीकर याचा विवाह वाडेगाव येथील रोषणी हिचे सोबत दि. 9 एप्रिल ला सानंद संपन्न झाला लग्न समारंभ आटोपल्यावर नवरी घरी आल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी घरात नवचैतन्य व नवरी आल्याची धावपळ नान्होरा, वाटमोकळी, वान वाटप इत्यादी कार्यक्रम असतात; परंतु पाण्याचे भविष्यातील महत्त्व जाणून गत वर्षी एकट्याने श्रमदान केले. आता जोड्याने श्रमदान करायचा संकल्प केलेल्या भुषणने दुसर्या दिवशी सकाळी गाव शिवारात पाणी फाऊंडेशनच्या सुरू असलेल्या श्रमदानाला आपल्या सहचारिणी सोबत हजेरी लावून श्रमदान केले. नवरदेव नवरी बांधावर येवून श्रमदान करत असल्याचे पाहून इतर गावकरी जोमाने श्रमदानाला लागले. त्यामुळे गावात पाणी फाऊंडेशनचे तुफान आल्याचे दिसत आहे. यावेळी गावचे सरपंच, सदस्य, विविध सामाजिक संस्था, संघटना व पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी समन्वयक इत्यादी उपस्थित होते.
अधिक वाचा : व्याख्यान करून मानधन न घेता गोरगरिब विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola