अकोला (प्रतिनिधी)– अकोला शहरासह जिल्ह्यात हत्येचे सत्र थांबता थांबत नसून आज पुन्हा ८२ वर्षीय वृद्धाचा मृतदेह सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत आढळल्याने आज एकच खळबळ उडाली होती.
सविस्तर वृत्त असे आहे की अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील पंचशील परिसरातील एका खदाणीत आज सकाळी ८२ वर्षीय वृद्धाचा मृतदेह असल्याची बाब सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन ला माहिती पडताच सिव्हिल लाईन पोलीसानी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवली असता सदर मृतदेह एकनाथ अंबादास भगत वय ८२ वर्ष रा लहान उमरी अकोला यांची असल्याचे कळाले.एकनाथ भगत हे रविवार पासून मिसिंग होते.त्यांचा शोध सुरू होता.आज सकाळी त्यांचा मृतदेह एका खदाणीत आढळला सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.भगत यांचा मृत्यू कसा झाला या संदर्भात पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा : मन हेलवणारी घटना-पत्नी प्रियकरासोबत पळुन गेल्याने पतीने दोन चिमुकल्यांसह स्वतःला लावला गळफास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola