नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले असून अशा स्वरुपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती मोदींनी दिली. आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही. आम्ही भारताच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवली. आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही, असेही त्यांनी सांगितले.काही वेळापूर्वीच आमच्या वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडलं आहे.
भारतानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचं नाव कोरलं असून, देशासाठी हा गर्वाचा दिवस आहे, असेही मोदी म्हणाले आहेत. अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्याने भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळाले आहे, असेही मोदी म्हणाले. ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये भारताने ‘अँटी सॅटेलाइट मिसाइल’द्वारे (उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र) एक उपग्रह पाडला. अवघ्या ३ मिनिटांमध्ये हा उपग्रह पाडण्यात आला. ३०० किलोमीटर अंतरावरुन लक्ष्यभेद करण्यात यश आले असून ही चाचणी यशस्वी झाल्याने अंतराळातही भारताची सुरक्षा वाढली असल्याचे मोदींनी सांगितले.
आज सकाळीच ११:४५ ते १२ वाजेदरम्यान महत्त्वाची घोषणा करणार आहे, असे मोदींनी टि्वट करत सांगितले होते. तुमचा टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडिया सुरू ठेवा, असेही ते म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाच मोदी आज (बुधवारी) नेमकी काय घोषणा करणार, याकडे देशवासियांचे लक्ष लागून होते.
अधिक वाचा : राहुल गांधींच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकरने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola