पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (१७ मार्च) निधन झालं. कर्करोगाच्या प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जनतेचा नेता गेला, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिली. वयाच्या ६३ व्या वर्षी पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारी महिन्यापासूनच त्यांना कर्करोगाचं निदान झालं आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळत गेली.
आयआयटी मुंबईमधून पदवी शिक्षण घेतलेल्या पर्रिकरांच्या जाण्याने देशाच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. फक्त राजकारणच नव्हे, तर कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतूनही पर्रिकर यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पर्रिकर यांच्या निधनानंतर साऱ्या देशातून दु:ख व्यक्त करण्यात येत असून, सोमवार (१८ मार्च) हा दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्रिकरांच्या अंत्यसंसंकारांसाठी गोव्यात उपस्थित राहणार आहेत. अकरा ते चार या वेळेत जनतेने त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतल्यानंतर पर्रिकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वसामान्य जनतेला पर्रिकरांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. गोव्यात सात दिवसांचा दुखवटा जाहीर. राज्यात सोमवारी होणाऱ्या बारावीच्या परीक्षाची तारिख पुढे ढकलली आहे.
अधिक वाचा : कृष्णादादा तिडके यांच्यावर भाजपा (ओबीसी मोर्चा) जिल्हा सरचिटणीसपदाची मोठी जबाबदारी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola