तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा शहरातील माहेश्वरी भवन जवळ राहणाऱ्या एका सट्टेखोरच्या घरी अकोला एल सी बी ने छापा टाकून आरोपीसह हजारोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक माहेश्वरी भवन जवळ राहणाऱ्या सुरेश राधाकिसन जोशी ४० याच्या घरी सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर सट्टा लावण्यात येत असल्याची गुप्त बातमी अकोला एल सी बी ला मिळताच सापळा रचून जोशी याच्या घरी छापा टाकला असता त्या ठिकाणी क्रिकेट च्या खेळावर ऑनलाइन पद्धतीने सट्टा लावण्यात असल्याचे निर्दशनास आले सदर कारवाई ही सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान करण्यात आली.यावेळी आरोपिकडून सट्टा लावण्यात येणारे विविध प्रकारचे साहित्य जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली.कलम ४,५ महाराष्ट्र जुगार अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे, अशोक चाटी, अश्विन सिरसाट, फिरोज खान, अब्दुल मजीद, एजाज अहमद, रवी इरचे, शेख नालीस, टूनशा घुमन यांनी केली.
अधिक वाचा : अकोट पोलिसांनी २२ हजाराचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola