तळेगांव बाजार (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातील तळेगांव बाजार येथील श्री सोमश्वर महाराजांची यात्रा दि. ६ मार्चला शांततेत पार पडली या यात्रेमध्ये पाच हजार भावीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दर वर्षी प्रमाणे या वर्षीही श्री सोमेश्वर महाराजांची यात्रा शांततेत पार पडली. दुपारी ०१ वाजता गावातुन रथ यात्रा सुरु होऊन सायंकाळी ६ वाजता दहीहांडी व महाआरती होऊन बाहेर गावा वरुण येणाऱ्या पाच हजार भावीकांना लोकांनी दिलेल्या वर्गनीतुन सोमेश्वर सस्थांन च्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. या यात्रा महोत्सवात आजुबाजुच्या गावातील भावीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिति दर्शवली. यात्रेत कोनताच अनुसूचित प्रकार घडूनये म्हणून हिवरखेड़ चे ठाणेदार सोमनाथ पवार यानी चोख बंदोबस्त ठेवला या वेळी गावातील नागरीक उपस्थित होते.
जि.पो. अधीक्षक राकेश कलासागर यांची भेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी या यात्रा महोत्सवा निमित्त तळेगांव बाजार येथे भेट देऊन सोमेश्वर महाराज मंदिरात जाऊन महापूजा केली व गांवाचे माजी पोलीस पाटील जनार्दन खारोडे यांच्या जवळून गावातील माहीती घेतली. या वेळी सस्थांनचे अध्यक्ष संतोष खारोडे यांनी राकेश कलासागर यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला बप्पूराव खारोडे, सरपंच राम खारोडे, पत्रकार सदानंद खारोडे, उद्धव मानखैर, पी. एस. आय. पंकज वाघोडे, विलास खारोडे, दिनेश खारोडे, तंटामुक्त समिति अध्यक्ष हरिदास खारोडे, योगेश खारोडे, गोलु खारोडे, सुबोध राउत, मयुर खारोडे व छ. संभाजी राजे प्रतिष्ठिन चे सर्व कार्यकर्ते व गावातील नागरीक उपस्थित होते.
अधिक वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचे भूमिपूजन थाटात संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola