अकोला (प्रतिनिधी) : दुष्काळी वर्षातही विना खत, विना फवारणी, एकरी दहा क्विंटल कापूस उत्पादन अकोला तालुक्यात खडकी येथील शेतकरी किसनराव हुंडीवाले यांनी घेतले आहे. खरे वाटत नाही ना! पण हेच सत्य असून, त्यांनी ही किमया करून दाखविली आहे. एका देशी कापूस वाण लागवडीतून.
जिल्ह्यात प्रयोगशील शेतकरी म्हणून किसनराव हुंडीवाले यांची ख्याती आहे. खडकी परिसरात त्यांची शेती असून, त्यावर कापूस, हरभरा, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, तीळ, मोहरी या व्यतिरिक्त विविध भाजीपाला, फळपिकेसुद्धा ते दरवर्षी घेतात. त्यातही प्रायोगिक तत्वावर काही पिकांच्या वेगवेगळ्या वाणांची पेरणी करून ते कमी खर्चात अधिक उत्पादन व गुणवत्ता देणाऱ्या पिकाचा शोध घेत असतात.
अशाच प्रयोगातून त्यांनी तीन वर्षापूर्वी एका देशी कापूस वाणाची एक एकरावर लागवड केली. त्याला कोणतेही खत, फवारणी, टॉनिक दिले नाही, तरीसुद्धा या वाणापासून त्यांना एकरातून आठ क्विंटल कापूस उत्पादन झाले. पातेगळही कमी आणि किडीचा शुन्य प्रादुर्भाव असल्याने, त्यांनी हे वाण अधिक क्षेत्रावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी यंदा दहा एकरावर या वाणाची लागवड केली. पेरणीवेळी दिले तेवढेच खत, त्यानंतर कोणतेही खत किंवा फवारणी या पिकावर त्यांनी काढली नाही. पावसाचे पाणी व दोन पाण्याच्या पाळ्या दिल्या आणि एवढ्यावरच पीक सहा फुट उंच झाले. त्याला पात्याही जोरदार धरल्या आणि उत्पादनही जोरदार मिळाल्याचे ते सांगतात.
इतर शेतकऱ्यांनी केला प्रयोग
किसनराव हुंडीवाले यांनी अत्यल्प खर्चात घेतलेले भरघोस कापूस उत्पादन पाहून तालुक्यातील इतरही काही शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेऊन, या पीक वाणाची पेरणी केली आणि त्यांनाही चांगले उत्पादन झाल्याचे ते सांगतात.
पेरणी, वायी ट्रॅक्टरने
ट्रॅक्टरद्वारे त्यांनी या कपाशी वाणाची पेरणी केली. त्यामध्ये पाच फुटाचा सवा ठेवला. दोन वायांमध्ये अंतर अधिक असल्याने, छोटा ट्रॅक्टरद्वारेच त्यामध्ये वाया काढण्यात आल्या. शिवाय मोठ्या प्रमाणात पात्यांची लागन होत असूनही पाते गळ नगन्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : बळीराजाला कापूस दरवाढीची प्रतीक्षा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola