अकोला (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते आणि गृह (शहरे) राज्यमंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निमवाडी, पोलीस मुख्यालयाजवळ, अकोला येथे आज संपन्न् झाले.
यावेळी आमदार हरिश पिंपळे, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, नारायणराव गव्हाणकर, नगरसेवक आशिष पवित्रकार ,समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर , डॉ. अशोक ओळंबे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधिर धिवरे, जातपडताळणी समितीचे उपाध्यक्ष संजय कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक न्यायाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे सांगुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे पुढे म्हणाले की, अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेले सामाजिक न्याय भवन आता लवकरच तयार होणार आहे.
सामाजिक न्याय भवनाच्या जागेचा प्रश्न असल्यामुळे भवन उभारण्यास विलंब झाला असे सांगुन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील पुढे म्हणाले की, गृहविभाग व नगरविकास विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे 19 कोटी 39 लाख रूपये खर्च करून सदर सामाजिक न्याय भवनाची सुसज्ज इमारत तयार होणार आहे. यामुळे मागासवर्गीय विदयार्थ्यांसाठी एक दालन तयार होणार आहे. यात मागासवर्गीयांच्या विविध योजना एकाच छताखाली असुन सामाजिक सांस्कृतिक कामासाठी सभागृह उपलब्ध होणार आहे तसेच अनुसुचित जातीच्या लघु उद्योजक व महिला बचत गटातील उत्पादनाच्यासाठी बाजारपेठ म्हणुन या सभागृहाचा उपयोग होणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन रिना धोटे तर उपस्थितांचे आभार प्राचार्य श्री. गोरे यांनी मानले. यावेळी दलित मित्र, विविध पुरस्कार प्राप्त्, सामाजिक कार्यकर्ते, समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे कार्यालय, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अकोला यांच्या कार्यालयासह सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, चर्मोद्योग विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती महामंडळ तसेच मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अंध अपंग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हास्तरीय कार्यालये राहणार आहेत.
तसेच सांस्कृतिक सभागृह, अभ्यासिका, वाचनालय, माहिती केंद्र, संगणक सुविधा केंद्र, संग्राहालय, कलादालन, बैठक हॉल, कॉन्फरन्स हॉल, उपहारगृह आदी सर्व सुविधांनी युक्त सामाजिक न्याय भवन निर्माण होणार आहे.
अधिक वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचा दि. 3 मार्च रोजी भूमिपूजन सोहळा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola