तेल्हारा दि :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल कोठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर व्हावा या करिता आज 1 मार्चला लोकजगार मंच च्या वतीने तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले . या वेळी लोकजगर मंचचे तेल्हारा शहर अध्यक्ष राजेश काटे , जिल्हा कार्याध्यक्ष गोपाल जळमकर ,चंद्रकांत मोरे, जनार्धन चतारे, म.ग.देशमुख,अनिकेत ढवडे, किरण मोरे,आकाश बावणे,विकास अंबोरे, रवी तायडे, शुभम बरडे,राहुल भिवटे,शेख नूर,दीपक अहेरकर,निलेश जवकार,विशाल नांदोकर,विठ्ठल मामनकार ,शुभम टिकार,संघर्ष बोदडे आदी उपस्थित होते