अकोला (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करणाऱ्या दोन चित्ररथांना आज अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. तळागळातील लोकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी हे चित्ररथ अकोला जिल्हयात फिरणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पार पडलेल्या सदर कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आदींसह सदर दोन्ही विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
चित्ररथांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिध्दीसाठी मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. तसेच योजनांच्या फलेक्सचा समावेश आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांनी योजना जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा : सामाजिक संस्थांच्या कार्यात वृत्तपत्रांची,प्रसारमाध्यमांची भूमिका मोलाची -मिरसाहेब
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola