तेल्हारा (विशाल नांदोकार)- श्री संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन म्हटले की सर्वप्रथम नजरेसमोर येतो तो श्रींच्या भक्त्यांची श्रींच्या भेटीसाठी लागलेली उत्सुकता त्यासाठी मैलोंमैल पाई जावून श्रींची भेट घेउन मिळालेले समाधान. ह्याच समधानाकारिता भक्तगण पायी जातांना स्वतःचे देहभान विसरून स्वताला श्रींच्या चरनी झोकुन देतांना रस्त्याने पायी जात असतांना भक्त्यांच्या सेवेसाठी अनेकठिकाणी अनेक भाविक तनमनधनाने या भक्तांची सेवा करन्यात दंग होउन जातात. यावेळी श्रींच्या भक्तांची सेवा करण्यासाठी मुस्लिम बांधव करीत असलेल्या धडपडिवरुण हिन्दू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडून येत होते.
तेल्हारा शहरातील भक्त दरवर्षी शेगावी पायी जाणार्या भक्तांकरीता लोहरा येथील मुस्लिम मदरसाच्या बाजूला फराळचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी सुद्धा असेच आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक मदरसामधील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वइच्छेने येउन उभारलेल्या मंडपात सुरु असलेल्या कामात हातभार लावून, भक्तांना फराळ वितरण, व इतर कामे करू लागले तसेच शेगावी जात असलेल्या भक्तांना विनंती करून प्रसाद घेण्याचा आग्रह करत असल्याचे पाहून हिन्दू मुस्लिम एकोप्याची प्रचिती आली. यावेळी तेल्हारा शहरातील नागरिक मदरशातिल विद्यार्थी, शिक्षक व् बहुसंख्य भक्तगनांनी प्रसादाचा लाभ घेतला.