अकोट(मनीष ठाकूर)- भारिप बहुजन महासंघाचे पंचायत समीती सर्कलनिहाय सर्कल अध्यक्ष व महासचिवांची नियुक्ती पक्षनेत्यांनी केली रौंदळा सर्कल अध्यक्षपदी ऊमेशभाऊ बोरचाटे यांची नियुक्ती करण्यात आली.
भारिप पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपभाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिति सभापति सौ.आशाताई राजेंद्र एखे,तालुका अध्यक्ष संदिपभाऊ आंग्रे ,महासचिव धिरजभाऊ सिरसाट,मंगेशभाऊ ताडे,शैलेषभाऊ धांडे यांनी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सर्कलनीहाय अध्यक्ष व महासचीव नियुक्त करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिपभाऊ वानखडे यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या व पक्षसंघटन वाढविण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.