• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य, आरोपीला १० वर्षांची शिक्षा

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोला शेगाव
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलैड यांच्या न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या प्रकरणाचा निकाल अवघ्या ८ महिन्यांमध्ये लागला. ही घटना जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. गजानन किसन अरदळे (वय, ४०) असे आरोपीचे नाव आहे.

जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एक १२ वर्षीय मुलगा २४ एप्रिल २०१८ ला दुपारी शौचालयासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहात गेला होता. आरोपी गजानन अरदळे हा तिथे उपस्थित होता. त्याने त्या मुलाला शरिरसुखाची मागणी करत ५०० रुपये देऊ केले. त्या मुलाने त्याला नकार दिला. यामुळे चिडलेल्या गजानन याने त्याच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. त्या मुलाने हा सर्व प्रकार घरी सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये कलम ३७७, ३२३ पोस्को ७, ८, ९, १०, ११, १२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जुने शहरचे पोलीस उपनिरीक्षक रामराव राठोड यांनी तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. आरोपीने जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने आरोपीला जामीन मंजूर करीत ४ महिन्यांच्या आत प्रकरण निकाली काढावेत, असे आदेश दिले. त्यानुसार हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालले.

सरकार पक्षातर्फे ८ व आरोपी पक्षातर्फे साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले. दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच कलम ३२३ मध्ये एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंड पोस्को ७, ८मध्ये ५ वर्षे व ५ हजार रुपये दंड, पोस्को कलम ९, १० मध्ये सात वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंड आणि पोस्को कलम ११, १२ मध्ये तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड न्यायालयाने ठोठावला. सरकार पक्षातर्फे एडवोकेट मंगला पांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

अधिक वाचा : अकोल्यात जुगाराच्या दोन अड्ड्यांवर छापे; 50 जणांवर कारवाई, गुन्हा दाखल

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

तेल्हारा तालुक्यातील अर्धी जास्त गावे पोलीस पाटलाविना

Next Post

संत तुकाराम महाराज जयंती निमित्य जुने शहर येथे नियोजन बैठक संपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

संत तुकाराम महाराज जयंती निमित्य जुने शहर येथे नियोजन बैठक संपन्न

बाळापूर पारस येथे युवासेना सदस्य नोंदणी ला उत्कृष्ट प्रतिसाद

पारस येथे युवासेना सदस्य नोंदणी ला उत्कृष्ट प्रतिसाद

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.