मुंबई : दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी मदतनिधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात हा निधी तातडीने जमा करण्याचे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले आहेत.
राज्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये मदत निधीचे वाटप सुरु करण्यात आले असून त्यासाठी 1 हजार 450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि तेथून संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांना हा निधी वर्ग केला जाईल.त्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या थेट खात्यात हा निधी वितरित केला जाईल. यासाठी बहुतांश जिल्ह्यांमध्ये गावनिहाय याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर काही जिल्ह्यांनी याद्या पूर्ण झालेल्या गावांमध्ये निधीदेखील वितरित केला आहे.
दुष्काळ मदतनिधीचे वितरण तातडीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. याद्या तयार करण्याचे काम तातडीने पूर्ण करुन तातडीने निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा, असंही मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या कामाचा आढावा देखील मुख्य सचिवांनी घेतला.
अधिक वाचा : लहुजी शक्ती सेनेने केले लोटांगन आंदोलन!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola