मूर्तिजापूर : लग्नाआधी गर्भात असलेल्या बाळाचा लग्नानंतर जन्मदात्या आईनेच गळा आवळून निघृण खून केल्याचा घृणास्पद प्रकार काल येथे उघडकीस आला.
पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील एका युवतीचा अमरावतीच्या युवकाशी विवाह झाला होता. विवाहापूर्वीच अनैतिक संबंधातून तिला गर्भधारणा झालेली होती. हा प्रकार तिने पतिला सांगितला होता व गर्भपात न करता त्या बाळाला आपण वागवू असे पतीने तिला अभिवचन दिले होते. मात्र प्रसुतीनंतर त्याने नकार दिल्यामुळे ती बाळाला घेऊन माहेरी आली होती. दोन महिन्याचे हे बाळ सर्दी, खोकल्याने आजारी होते. २० जानेवारीला येथील एका खासगी रूग्णालयात उपचार करून आईने बाळाला घरी आणले. हात लाऊन बघितले असता बाळ प्रतिसाद देत नव्हते, असे आईने सांगितल्यानंतर मृत बाळाच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. काल प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात गळा आवळून बाळाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
बाळाच्या मातेला ताब्यात घेण्यात आले. दोरीने गळा आवळून बाळाला यमसदनी पाठविल्याची कबुली तिने ग्रामीण पोलीसांवजवळ दिली. येथील कनिष्ठ स्तर न्यायालयाने आज या मातेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ठाणेदार एपीआय नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीसांनी ही कारवाई केली.
अधिक वाचा : अकोला कोतवाली पोलिसांनी गोमांस पकडले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola