बेलखेड (चंद्रकांत बेंदरकार)- दिनांक 28 जानेवारी ला येथील अल्पभूधारक शेतकरी श्री. विलास नारायणराव कुयटे यांनी जळगाव कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून मशरूम शेती करीता मार्गदर्शन घेतलेले आहे. शेती आणि त्यातही अल्पभूधारक असल्याने उत्पन्नाला मर्यादा म्हणून त्यांनी शेतीपूरक जोड व्यावसायाची कास धरत बेलखेड सारख्या गावातून मशरूम उत्पादनाला सुरुवात करून त्याचे मार्केटिंगचे कसब आत्मसात करत आज ते उत्पादक ते ग्राहक या मादयमातून स्वतः मशरूमची विक्री करीत आहेत. त्यांच्या उद्योगाला त्यांच्या पत्नीची व कुटुंबातील ईतर सदस्यांची मोलाची साथ लाभत आहे. या शेतीजोड व्यावसायामुळे त्यांच्या कुटुंबाचे अर्थशास्त्र ताळ्यावर आले.
लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री अनिलभाऊ गावंडे यांनी आज त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या या अभिनव मशरूम शेती बद्दल माहिती घेऊन कौतुक केले. कुयटे यांनी मशरूम सोबतच मशरूमयुक्त प्रक्रिया पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावे. त्यांना लोकजागर च्या माध्यमातून ग्राहक मिळवून देऊ असे अश्वासीत केले. विलास कुयटे यांचा आदर्श घेत ईतर शेतकऱ्यांनी ही शेतीपूरक जोडधंदे उभारावेत त्याकरीता लोकजागरा च्या माध्यमातून मार्केटिंग करिता जाळे उभारण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या पारंपारिक दुग्धव्यावसायातून रोजागाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत व शेतीला जोडधंदा असला पाहिजे म्हणून तेल्हारा तालुक्यात 25 हजार लिटर क्षमतेचा चिलिंग प्लांट लवकरच सुरू होत आहे.
दुधा करीता व शेती उत्पादना करिता मोठा व प्रामाणिक ग्राहक तयार झाला असून त्याकरिता लोकजागर मंच शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे नेटवर्क उभे करीत आहे असे यावेळी सांगितले. यावेळी सोबत लोकजागर मंच जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार,अकोट ता. अध्यक्ष अनंतराव सपकाळ, तेल्हारा ता. अध्यक्ष संदीप गावंडे योगेश जायले, अमित डोबाळे, मा. सरपंच हरिभाऊ कुकडे, श्रीजीत गडम, आनंद रोडे व ईतर सदस्य उपस्थीत होते.
अधिक वाचा : सातपुड्याच्या कुशीतील पाणीदार तारुण्य म्हणजे अनिल गावंडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola