अकोला (निलेश किरतकर)- बोरगाव मंजू येथील राम नगरात रराहणारे तीन युवक चहा पिण्यासाठी बस स्टॅन्ड वर गेले होते. एवढ्यातच समोरून अज्ञात व्यक्ती मोटारसायकल वर येत होते. दोन्ही गाड्या समोरासमोर क्रॉस झाल्याने एकमेकांकडे रागाने का पाहिले, या वरून वाद होऊन त्याच्यात जबर हाणामारी झाली. या हाणामारीत अज्ञात गुन्हेगारानी या ३ युवकानं वर चाकूने हल्ले करत जबर जखमी केले आहे .गणेश गवई,आकाश आठवले,अजय इंगळे अशी जखमी युवकांची नावे असून त्या पैकी अजय इंगळे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे समजले आहे. हल्ला करणारे अज्ञात व्यक्ती अमरावती येथील रहिवाशी असल्याचा अंदाज आहे. हे युवक लुटमार करण्याच्या उद्देशाने आले असल्याचा संशय गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.या अज्ञात युवकांनी चाकूने हल्ला करून घटना स्थळावरून पसार झाले.
पुढील उपचारासाठी जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाबाबत बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत. हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना तत्काळ अटक करावे अशी युवकांच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे.
अधिक वाचा : थकित वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर ग्राहकाचा हल्ला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola