तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील खाकटा येथील इसमाने रहिवासी दाखला मिळवण्यासाठी दि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना एका अर्जाद्वारे दिला याबाबत तेल्हारा पोलीस सदर इसमाचा शोध घेत आहेत
प्राप्त माहितीनुसार तेल्हारा तालुक्यातील खाकटा येथिल राजकुमार आनंदराव शिरसाट यांनी येथील पोलीस पाटील बंडूभाऊ गवारगुरु यांच्याकडे रहिवासी दाखला मिळवण्यासाठी मागणी केली असता तो मिळवू शकत नसल्यामुळे राजकुमार शिरसाठ यांनी जिल्हाधिकारी अकोला ,जिल्हा पोलीस अधीक्षक ,उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट, यांच्याकडे रहिवासी दाखला मिळवण्यासाठी अर्ज करून रहिवासी दाखल्यासाठी दिनांक 26 जानेवारी रोजी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे याप्रकरणी तेल्हारा पोलीस राजकुमार शिरसाट याचा शोध घेत असून आतापर्यंत त्यांचा शोध लागला नाही आत्मदहनाचा इशारा देणारा पंचशील नगर बायपास अकोला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे राजकुमार शिरसाठ यांना खाकटा येथे पोलिसांनी शोधले असता ते मिळू शकले नाही