अकोला (प्रतिनिधी): भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 25 जानेवारी 2019 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवनात प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्र व बिल्ला प्रदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली देवकर यांनी केले आहे.
अधिक वाचा : हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बेलखेड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola