• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील घुसखोरी सहन करणार नाही : अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील घुसखोरी सहन करणार नाही : अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात काही दिवसांपासून शेकडो नागरिकांनी घुसखोरी करुन हरणांसाठी तयार केलेल्या गवती कुरणांना जाळून नष्ट केले, हा दंडनीय अपराध आहे. मेळघाटात सुरु असलेल्या व्याघ्र संवर्धनाच्या कार्याच्या विरोधात कृत्य करणाऱ्या व त्यांना चिथावणी देणाऱ्यांची आता अजिबात गय केली जाणार नसल्याचा कडक इशारा अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी यांनी दिला आहे.

अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

श्री.रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, १४ गावांच्या पुनर्वसनानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात कोट्यावधी रुपये खर्चून खास हरणांसाठी गवती कुरणांची निर्मिती करण्यात आली. या कुरणांमुळे नैसर्गिक अधिवास वाढून वाघादी वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. तसेच, मर्यादित निसर्ग पर्यटनास प्रोत्साहन देण्यात आल्याने पर्यटनात वाढ होऊन स्थानिक आदिवासींना रोजगारही मिळाला, असे असतांना काही राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी पुनर्वसित आदिवासींची दिशाभूल करुन,तसेच त्यांना चिथावणी देऊन संरक्षित वनक्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी प्रवृत्त केले. घुसखोरीनंतर केलपाणी भागातील गवती कुरण जळून नष्ट झाल्याने उन्हाळ्यात वन्यप्राणी वनक्षेत्राबाहेर पडून वन्यप्राणी-मानव संघर्ष उदभवण्याची शक्यता आहे.

अकोटच्या वनक्षेत्रातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून मेळघाट व्याघ्र संचलनालय कठोर पावले उचलणार आहे,असा सुचक इशाराही एम.श्रीनिवास रेड्डी यांनी दिला आहे. ज्या राजकिय कार्यकर्त्यांनी आदिवासींना हाताशी धरुन त्यांची राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला;त्यांच्या मुसक्या बांधण्याची तयारीही पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मेळघाट व्याघ्र संचलनालय या घुसखोरीच्या प्रकरणाचा सखोल तपास करत असून त्यानुसार आदिवासींना चिथावणी देणाऱ्या राजकिय कार्यकर्त्यांची यादीच व्याघ्र प्रकल्पाचे गुप्तचर खाते तयार करत आहे. लवकरच वन्यप्राणी संरक्षण कायद्यांतर्गतकठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे चिथावणी देणारे अकोटातील दलाल व राजकिय कार्यकर्यांचे धाबे दणाणले असल्याचे श्री.रेड्डी यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी दोनदा अश्याच पद्धतीने पुनर्वसित आठ गावच्या काही लोकांनी त्यांच्या विविध मागण्या मांडल्या होत्या.त्यावर शासनाने दिलेल्या बहुतांश आश्वासनांची पूर्तताही जिल्हा प्रशासनाने केली आहे. पुनर्वसन करते वेळी कुणीही पाच एकर शेतीची मागणी केली नव्हती.आता तीन-चार वर्षानंतर प्रती कुटुंब पाच एकर शेतीची मागणी लावून धरणे उचित नाही. तसेच त्यासाठी वनसंपत्ती हानी करणे दंडनीयच अपराध आहे,असे श्री रेड्डी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये म्हटले आहे.

अधिक वाचा : संपादकीय ………नाहीतर मेळघाटचेही होऊ शकते ‘गडचिरोली’ !

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola newsAkola news in Marathi
Previous Post

तेल्हारा तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाच्या धडक कारवाया

Next Post

tv channels: चॅनल न निवडल्यास १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद?

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
tv channels: चॅनल न निवडल्यास १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद?

tv channels: चॅनल न निवडल्यास १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद?

तेल्हारा नगर परिषद कडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांची पायमल्ली ! जीवन वानखडेचा उपोषणाचा ईशारा

तेल्हारा नगर परिषद कडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांची पायमल्ली ! जीवन वानखडेचा उपोषणाचा ईशारा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.