अकोला – अमरावती जिल्ह्यातील पहाडी भाग असलेल्या मेळघाट मध्ये अलिकडच्या काळात काही मुद्दे निर्माण झाले आहेत.शांतीप्रिय, लाजाळू आणि प्रशासनाला ईश्वर माननारा येथील आदिवासींनी आता थेट प्रत्योत्तर देण्यासाठी शस्त्र हाती घेत आहे.ही गोष्ट अलिकडच्या त्यांच्या आक्रमकते वरुन दिसून येते.त्यांच्या मनात ही खदखद कधी पासून ,एवढा रोष का निर्माण झाला ? याची कारणमिमांसा होणे गरजेचे आहे.अन्यथा समांत्तर सरकार स्थापन्याचे स्वप्न पाहणाऱ्याचा येथेही विळखा पडण्यास वेळ लागणार नाही. अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकलपाची निर्मिती करण्यात आली.आदिवासी या भागातील मुळ रहिवासी..उदरनिर्वाहासाठी गावाच्या आजुबाजुला शेती करुन गुरे पाळणे , दुधदुभत्याचा त्यांचा व्यवसाय. शांतप्रिय व लाजाळु असलेल्या येथील आदिवासींचा प्रशासनावर प्रचंड विश्वास.प्रशासनाव्दारे सुविधा उपल्बध करून दिल्या जात असल्याने त्यांना ( प्रशासन) ते देव मानतात.मग येथील आदिवासी एवढा का आक्रमक झाला ? हा खरा प्रश्न आहे.
मेळघाट येथील व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मिती नंतर ,वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी या जंगलातील गावांचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले.येथील आदिवासींचे पुनर्वसन तर करण्यात आले, पण त्यांच्या सुविधेकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही.यामुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.येथील समस्यांची सोडवणूक करण्यात यावी, यासाठी येथील आदिवासी अनेक वर्षांपासून झगडतो आहे.यामुळेच की काय? येथील गावकरी आपल्या मुळ गावी परतले होते.दरम्यान मुंबई येथे शासनस्तरावर येथील आदिवासींसोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आदिवासींव्दारे आपल्या १८ न्याय मागण्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता व या अनुषंगाने त्यांना आश्वासन सुध्दा देण्यात आले होते.मात्र शासनाव्दरे अद्याप आश्वासनाची पुर्तता न करण्यात आल्याने येथील आदिवासी परत आपल्या मुळगावी परतला आहे.मात्र त्यांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी वन विभाग व महसूल विभागाद्वारे प्रयत्न चालविले आहे.यावरून आदिवासी व प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.त्यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्यासाठी अधिकाऱ्यांद्वारे चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे.परंतु ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम असून, हटायला तयार नाही.पर्यायाने त्यांच्यातील संघर्ष पेटला आहे.
जंगलात ठाण मांडणारे गावकऱी दोन दिवसात जंगलाबाहेर न निघाल्यास त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा दरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अमरावती येथील क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी दिला होता.गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने, त्यांच्या विरुद्ध चिखलदरा पोलीस स्टेशन येथे नासधुस करुन वन संपत्तीचे नुकसान करणे, वन अधिकारी कर्मचारी यांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.याशिवाय त्यांना जंगलात घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्यां विरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आणि येथून या संघर्षाने भडका घेतला.
केलपानी या गावात ठाण मांडून बसलेल्या २०० ते ३०० नागरिकांनी मंगळवारी अचानक रौद्ररूप धारण केले व जंगलातील घुसखोरीला प्रतिबंध घालण्यासाठी तैनात असलेले २० ते २५ वन अधिकारी कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून ,लाठ्या काठ्यांनी व अन्य शस्त्राने मारहाण केली.यात वन कर्मचारी जखमी झाले.जखमींना तात्काळ हास्पिटल मध्ये भरती करण्यात आले.
खरं तर ही दुर्दैवी घटना आहे.मग प्रश्न निर्माण होतो,ग्रामस्थ एवढे आक्रमक होण्याचे कारण काय? त्यांच्यामध्ये ही खदखद कधी पासून होती , व एवढी आक्रमक भूमिका घेण्यामागचे कारण काय ? याचा विचार होणे गरजेचे आहे. येथील नागरिक आता पर्यंत होणारा अन्याय सहन करीत राहिले. पण नवीन पिढी अन्याय सहन करण्यास तयार नाही.हेच यावरून दिसून येते. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ही खदखद एका दिवसातील नव्हती.त्यांचा अनेक दिवसांपासूनचा आपल्या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी संघर्ष सुरू आहे.शेवटी त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला.ही परिस्थिती निर्माण होऊ का दिली ? लोकप्रतिनिधी म्हणविणारे येथील मंत्री ,आमदार ,खासदार काय करीत होते? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
स्थानिक प्रश्नाच्या आड नक्षल्यांनी पूर्व विदर्भाच्या गडचिरोली,.गोंदियामध्ये आपली पायंमुळं रोवली.मेळघाट आदिवासी बाहुल भाग आहे.येथील जन आक्रोशाच्या आड माओवादी आपली पायंमुळं तर येथे रोवणार नाही ना ?अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
संपादक
अवर अकोला न्युज