खामगाव (प्रतिनिधी) : एसटी बस, रेल्वेमधून प्रवास करताना दिसणारा केरकचरा, घाण साफ करण्याचे काम अभियंता असलेला माणूस गेल्या काही दिवसांपासून करत आहे. त्यांची प्रत्यक्ष कृती पाहून अनेकांमध्ये स्वत:हून बदल होत आहे. त्यांचा हा उपक्रम सर्व सामान्य प्रवाशांना प्रेरणादायी ठरत असल्यामुळे बहुतांश प्रवासी आता कचरा पेटीचा वापर करायला लागले आहेत. खामगाव पंचायत समितीमध्ये अभियंता असलेले शंकर घाटोळ यांनी कोणत्याही प्रकारचा कमीपणा न बाळगता एसटी बस, रेल्वेचा डबा ही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याचा चंग बांधलेला आहे.
केवळ कागदोपत्री न बनता रेल्वे अथवा बसमध्ये प्रवास करताना त्याची स्वच्छता करत प्रवाशांना स्वच्छतेचे कानमंत्र देण्याचे काम पंचायत समितीचे अभियंता शंकर गोटीराम घाटोळ हे करत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून ते प्रवासी स्वच्छता दूत म्हणून काम करत आहेत.शेगाव येथील रहिवाशी व खामगाव पंचायत समितीमध्ये घाटोळ हे सध्या कार्यरत आहेत. ते एसटी बसने ये- जा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान देशभर राबवण्यात येत आहे. या अभियानाबाबत प्रशासनाकडून नागरिकांना अावाहन केल्या जात आहे. लाखो रुपये खर्चही होत आहे. आवाहनाला फारसा प्रतिसाद दिसून येत नाही.
रेल्वे स्थानक, बस स्थानक आदींसह विविध सार्वजनिक ठिकाण कचरा पेट्या लावण्यात आल्या असताना त्याचा उपयोग कोणी करत नाही. परंतु कचरा पेटीचा वापर होत नाही. लोक इतरत्र कचरा टाकून देत आहेत. रेल्वेत बेसिनच्या खाली कचरापेटी आहे. परंतु प्रवासी त्याचा वापर करताना दिसत नाहीत, आपल्या आसनाखालीच कचरा फेकून दिल्या जात आहे. बसमध्येही असेच चित्र बघावयास मिळत असल्याने अभियंता घाटोळ यांनी प्रवास करताना त्याची स्वच्छता करण्यास सुरुवात केली अाहे. २० जानेवारी रोजी वर्धा- भुसावळ पॅसेंजरमध्ये प्रवास करण्यासाठी शेगाव रेल्वे स्थानकावरून बसले.
यावेळीही त्यांनी रेल्वेतील प्लॉस्टीक पिशव्या व इतर कचरा वर्तमानपत्राच्या कागदात भरला. एेन सुटाबुटातील माणूस करत असलेले हे काम पाहून प्रवाशांनाही आश्चर्य वाटले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी तीन डब्यांमधील स्वच्छता केली आणि प्रत्येक डब्यातील प्रवाशांना स्वच्छतेचा कानमंत्र दिला. त्यांचे अनुकरण करत एसटी, रेल्वेगाडीमधील प्रवाशांचेही मतपरिवर्तन होऊ लागले आहे.
आपल्याला लाज वाटत नाही
बालपणापासून आपणास स्वच्छतेची आवड आहे. ही आवड इंजिनिअर झाल्यावरही जोपासत आहे. प्रवासा दरम्यान स्वच्छता करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. शंकर घाटोळ, अभियंता, पं. स. खामगाव.
अधिक वाचा : नगरपरिषदेच्या घंटागाडीचे केले प्रहार जनशक्ती पक्षाने लोकार्पण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola