अकोला(प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा दरम्यान अंबुजा फॅक्टरी जवळ घडली. अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळा वरुन पळून गेले असून बाळापूर पोलिसांकडून त्या वाहनाचा शोध सुरू आहे. दरम्यान दोन्ही बापलेकांच्या मृतदेहांना अकोला सर्वोपचार रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. आज रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास कान्हेरी (गवळी) येथील भाष्कर बोरकर व त्याचे वडील ज्ञानेश्वर बोरकर हे बापलेक कान्हेरी येथून अकोल्याकडे विना क्रमांकाच्या दुचाकीने जात होते.
दरम्यान त्यांची दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील अंबुजा फॅक्टरी जवळ पोचताच समोरुन भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे या दोन्ही बापलेकांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यानंतर अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.सदर मृत देह अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे रवाना केले तसेच अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली पुढील तपास पो स्टे बाळापूर करीत असून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, जयवंत शिंदे व गिरीश वीर हे पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत आहेत. अपघातामुळे कान्हेरी गवळी गावावर शोककळा पसरली आहे
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola