अकोला (प्रतिनिधी) : शेतीला पुरक व्यवसायाची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते, ही बाब ड़ोळ्यासमोर ठेवून अकोला जिल्हा प्रशासनामार्फत “ रोजगारक्षम शेती व्यवसाय ” ह्या सदराखाली शेतकरी हा ‘स्मार्ट उद्योजक’ हा अभिनव उपक्रम अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत बुधवारी मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती या विषयाबाबत जिल्हा नियोजन येथे साप्ताहिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) अशोक अमानकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, श्री. भारती तसेच जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
सुरूवातीला श्री. भारती यांनी मत्स्यव्यवसाय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनव्दारे उपस्थितांना दिली. मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती हा आतापर्यंत शेतकऱ्यांकडून दुर्लक्षीत राहीलेला व्यवसाय असून शेततळी, गांवतलाव, इत्यादी माध्यमांतून मत्स्यशेती हा व्यवसाय शेतकऱ्यांना सहजपणे करता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले. सदर विभागामार्फत राबविण्यायत येत असलेल्या योजनां अंतर्गत शेततळी तयार करणे, त्यांचे नुतनीकरण करणे, मत्स्यबीज शेतकऱ्यांना देणे, नविन बोट व जाळी खरेदी करण्या करिता अनुदान, मासे लवकर खराब होऊ नये म्हणून त्यांचे वाहतुकी करिता ईन्स्युलीन ट्रक, शितवाहने इत्यादींच्या खरेदी करिता अनुदान इत्यादी विविध बाबींकरिता विविध घटकांसाठी शासकीय योजना व त्या अंतर्गत अनुदान उपलब्ध असून, त्या बाबतचे सविस्तर विवेचन त्यांनी केले. केंद्र शासनाच्या निलक्रांती योजने अंतर्गत मत्स्यव्यवसायाला चालना देण्याचे सरकारचे धोरण आहे.
सद्यस्थितीत आपले कडील बाजारपेठेत मासळीला भरपूर मागणी आहे, मात्र त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने आपलेकडे मोठ्या प्रमाणात मुंबई व इतर राज्यातील बर्फात टिकवून ठेवलेली मासळी येते असे प्रतिपादन केले. मत्स्यव्यवसायामध्ये केवळ मत्स्यपालन हा एकमेव व्यवसाय नसून या अंतर्गत, लघू मत्स्यखाद्य कारखाने, मत्स्यबिज निर्मीती (हॅचरी) इत्यादीं मध्ये देखील मोठ्या संधी उपलब्ध असून त्या मार्फत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मीतीच्या संधी असल्याचे प्रतिपादन केले. अकोला जिल्ह्यामधील बराचसा भाग खारपाणपट्ट्यात मोडतो. खारपाण पट्ट्या करिता खाऱ्या पाण्यामध्ये जिवंत राहणाऱ्या माश्यांच्या नविन प्रजाती आल्या असून, खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांकरिता यामध्ये चांगल्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रगतीशील व यशस्वी मत्स्यशेती करणारे अकोला जिल्ह्यातील शेतकरी विठ्ठल पुरूषोत्तम माळी, रा. बहादुरा, ता. बाळापूर, जि. अकोला व समाधान इंगळे, रा. तेल्हारा, जि. अकोला यांनी देखाल मत्स्यशेती मधील आपले अनुभव शेतकऱ्यांना विषद केले. विठ्ठल माळी यांनी सन 2010 पासून आपण ह्या व्यवसायात असून, 1-एकर जागेत यशस्वीपणे आपण सदर व्यवसाय करीत आहोत, सदर व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक चांगला व कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळण्याचा पर्याय उपलब्ध झाला असल्याचे मत व्यक्त केले.
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola