अकोला (प्रतिनिधी) : महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याची बतावणी करून नळाचे रीडिंग घेणाऱ्या बोगस व्यक्तींची टोळी अकोला शहरात सक्रीय असल्याची माहिती आहे. रीडिंग घेऊन आणि बोगस देयके देऊन वसुलीही ही टोळी करते. अशा बोगस व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी नागरिकांना केले आहे.
त्यासंबंधीची तक्रार मनपा जलप्रदाय विभागास प्राप्त झाली आहे. या विषयामध्ये कनिष्ठ अभियंत्याव्दारे डाबकी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नागरिकांच्या घरी मीटर रीडिंग घेण्याकरिता आलेल्या इसमाकडे मनपाचे ओळखपत्र असल्याशिवाय रीडिंग घेऊ देऊ नये, तसेच मनपा पाणी पट्टी कराचा भरणा हा फक्त महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागातच करावा. इतर कोणी अनोळखी इसमाने पाणी पट्टी कर मागितल्यास त्याची तकार मनपाच्या जलप्रदाय विभागात करुन अशा टोळीला पकडून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर विजय अग्रवाल व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.
अधिक वाचा : अनाधिकृतरित्या लावण्यात येत असलेले केबल जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola