अकोला (प्रतिनिधी): अकोला मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जठारपेठ ते जवाहर नगर चौक रस्त्यावरील विनापरवानगीने लावण्यात आलेले जाहिरात होर्डिंग्स व बॅनर काढण्याची कारवाई केली.
मनपा क्षेत्रीय अधिकारी (पूर्व झोन) अनिल बिडवे यांच्या आदेशान्वये व उपस्थितीत नेकलेस रोडवरील ल.रा.तो. महाविद्यालय समोरील बजाज यांच्या घराची शिकस्त भिंतहीपाडण्यात आली.
मंगळवारी मुख्य पोस्ट ऑफिस ते रा.ल.तो. मार्गावरील हॉटेलने अतिक्रमित जागेवरील पेव्हर्स काढण्यात आले. या सोबतच सिटी कोतवाली ते नवीन बस स्थानक, गांधी चौक ते जैन मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते फतेह चौक, जनता बाजार समोरील हॉकर्स तसेच अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
ही कारवाई मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादुर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय थोरात, विजय बडोणे व अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola