• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पत्रकारांना दूषित पाणी पाजणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडून गौरव

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
मोर्णा
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- माेर्णा महोत्सवाच्या प्रसिद्धीवरुन शहरातील दैनिकांचे संपादक आणि पत्रकारांना आपल्या निवासस्थानी बोलावून दूषित पाण्याचे ग्लास आणि काडीकचऱ्याचा धूर करुन तो समोर फिरवणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची राज्य शासनाने २०१७-१८ या वर्षासाठी उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मंगळवारी ८ जानेवारीला निवड जाहीर केली.

शहरात आल्यापासून आपल्या विशिष्ट कार्यशैलीमुळे जिल्हाधिकारी पांडेय वादग्रस्त ठरले आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या मोर्णा महोत्सवाच्या कार्यक्रमांना कमी प्रसिद्धी दिल्याचे कारण देऊन त्यांनी संपादक व पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर विविध वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी संबधितांची माफीदेखील मागितली होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यांच्या या कृत्याचा जिल्ह्यात सर्वस्तरातून निषेध करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी त्यांची खात्यांतर्गत चौकशी होईल की काय, अशी कुजबूज शासनस्तरावर सुरू असतानाच त्यांना मात्र उत्कृष्ट सेवेचे बक्षीस मिळाले आहे. राज्यातील सात उत्कृष्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र शासनाने जारी केले. त्यात अमरावती विभागातून अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नाव आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल माध्यमातून पत्रकारांचे आभार मानून अकोलेकरांच्या कल्याणासाठी वचनबद्ध व समर्पित असल्याची भावना व्यक्त केली आहे.

वर्षभरात नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची दरवर्षी या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. आज जारी झालेल्या यादीत ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, नंदूरबारचे मल्लिनाथ कलशेट्टी, सोलापूरचे राजेंद्र भोसले, सांगलीचे व्ही.एन. काळम-पाटील, उस्मानाबादचे रा.वी. गमे व वर्धेचे शैलेश नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी पांडेय सोमवारपासून १५ दिवसांच्या रजेवर जात आहेत. त्यांच्या रजाकाळात जिल्हा प्रशासनाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तसा पत्रव्यवहार झाला असून त्याला अद्याप मंत्रालयाकडून हिरवी झेंडी मिळायची आहे. कौटुंबिक कारणामुळे जिल्हाधिकारी १४ जानेवारीपासून रजेवर जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यापूर्वीचे दोन दिवस दुसरा शनिवार व रविवार असल्याने शासकीय सुटी असेल. जिल्हाधिकाऱ्यांचा रजाकाळ २ फेब्रुवारीपर्यंत असेल. त्यानंतरचा दुसरा दिवस रविवार आहे. अर्थात सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी ते पुन्हा आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांच्या रजाकाळातील प्रभार अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे सोपविण्याबाबत मंत्रालयाशी पत्रव्यवहार झाला आहे. कदाचित शुक्रवार, ११ जानेवारी रोजी याबाबतचा आदेश धडकेल, अशीही माहिती आहे.

अधिक वाचा : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली रिधोरा गावाची पाहणी ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या अडचणी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Astik Kumar Pandey
Previous Post

कामगार संघटनांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

Next Post

महागडी पुस्तके मिळणार 70 रुपयांत!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महागडी पुस्तके मिळणार 70 रुपयांत!

महागडी पुस्तके मिळणार 70 रुपयांत!

आस्तिक कुमार पाण्डेय

उत्कृष्ट जिल्हाधिकाऱ्यांचा बहुमान मिळाल्याबददल जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.