अकोला (प्रतिनिधी): विविध कामगार संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल केला. केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटना आणि कृती समितीने मिळून हे आंदोलन केले.
आजच्या संपामध्ये ४५ कोटी संघटित आणि असंघटित कामगार सहभागी असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. हा संप ९ जानेवारीलाही सुरू राहणार आहे. देशाच्या विकासासाठी श्रम करणाऱ्या शेतकरी व कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कामगार संघटना आणि संयुक्त कृती समितीने देशभर संप पुकारला आहे. तसेच मोदी सरकार व फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केला आहे.
मूल्यवृद्धी कमी करा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्यपुरवठा सर्वांसाठी लागू करा, रोजगार निर्मिती करा, कामगार भरतीवरील बंदी उठवा, कामगार कायद्याचे काटेकोरपणे पालन करा, उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, सर्व कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करा, योजना कामगारांसह सर्व कामगारांचे न्यूनतम वेतन हे १८ हजार रुपये प्रति महिना पेक्षा कमी नसावे, सरसकट सर्व कामगारांना कमीत कमी ६ हजार रुपये प्रति महिना पेन्शनची व्यवस्था करावी, सार्वजनिक क्षेत्रातील संस्थानांचे निर्गुंतवणुकीकरण विक्री बंद करा, स्थायी आणि बारमाही काम असलेल्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामे करणे बंद करा, बोनस आणि भविष्य निर्वाह निधीसाठी लावण्यात आलेल्या पात्रतेसंबंधी अटी काढून टाका, अर्ज केल्यापासून ४५ दिवसांच्या आत अनुकंपा निधीत वाढ झाली पाहिजे, आंतरराष्ट्रीय संघटनांच्या अधिवेशनाचे प्रस्ताव सी ८७ व सी ९८ त्वरित लागू करा, कामगार कायद्यात बदल बंद करा, तसेच कामगार कायद्यांचे रूपांतर कोडमध्ये करू नका, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी या कामगारांनी हे २ दिवस संप केला आहे. या संपाला आजपासून सुरुवात झाली असली तरी कामगारांसोबत शासकीय कर्मचारी या संपामध्ये सहभागी नसल्याचे दिसून आले आहे.
कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते प्रदीप वखरिया, एस. एन. सोनवणे, राजन गावंडे, एस. एम. गोपनारायण, शैलेश सूर्यवंशी, रमेश गायकवाड, शिवशांत दलाल यांच्या नेतृत्वात हा मोर्चा अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये इंटक, आयटक, सिटू, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, ईपीएस ९५, एआयबँक, वीज कामगार, अंगणवाडी संघटना, आशा व गट संघटना, घरेलू महिला कामगार संघटना, बांधकाम मजूर व पेंटस अससोसिएशन, फुटपाथ युनियन, महाराष्ट्र प्रदेश सफाई मजदूर काँग्रेस आदी संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत.
अधिक वाचा : अकोला मनपा ने कर थकीत असलेली मालमत्ता केली सील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola