मुंबई: दुष्काळग्रस्त भागातील तरुण-तरुणींना रोजगार मिळावा यासाठी एसटी महामंडळाची महाभरती होणार होणार आहे. लवकरच ४ हजार २४२ पदांसाठी भरती होणार आहे. चालक आणि वाहक पदांच्या या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. या भरतीमध्ये इतर आरक्षणासह मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही एसटी महामंडळाने घेतल्याचेही रावते यांनी सांगितले.
याशिवाय औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे एस.टी महामंडळामार्फत कंत्राटीपद्धतीने भरण्यात येतील. ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांना या पदांच्या परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. ही भरती औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात होईल.
अधिक वाचा : २३ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाअंतर्गत मेगा भरती नाही
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola